मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन यांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, गावठी पिस्टलासह जिवंत काढतुस जप्त केले आहे. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे ०७/११/२०२२ रोजी मुंढवा पोलिस ठाणे हददीत येणा-या दिवाळी सणाचे अनुशंगाने गुन्हे प्रतिबंध गस्त करीत होते. मुंढवा तपास पथकातील अंमलदार पोहवा/७३२ दिनेश राने व पोशी/४४४१ स्वप्नील रासकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की आदीत्य महेश चौधरी (वय २१, रा. महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड पुणे) हा मुंढवा पोलिस ठाणे हददीत फिरत असून त्याचेजवळ तो गावठी पिस्टल बाळगून आहे. वरील मिळालेल्या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याबाबतचे आदेश वपोनी विष्णु ताम्हाणे यांनी दिल्यावर मुंढवा तपास पथक अधिकारी सपोनी श्री संदीप जोरे व स्टाफ जाहागिर चौक ते आंबेडकर चौक, घोरपडी, मुंढवा, पुणे या रस्त्यावर जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे आदीत्य महेश चौधरी (वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड पुणे) यास शिताफिने ताब्यात घेवून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी विरुध्द मुंढवा पोलिस ठाणे गुर नं ३६३ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३, (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णीक, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, संगिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संदिप जोरे, पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे, पोशी ४४४१ स्वप्नील रासकर, पोहवा दिनेश भांदुर्गे, पोहवा राहुल मोरे सचिन पाटील यांनी केली आहे.

मुंढवा पोलिस ठाणेचा अगळावेगळा पर्यावरण पुरक उपक्रम…

पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!