पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्टल जप्त…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.

गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा.पोलिस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे ०५/११/२०२३ रोजी संशयीतांची माहिती काढत होते. पोलिस हवालदार निशांत काळे, विजय नलगे व पोलिस अंमलदार सुधीर डोळस, यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने हा आंबेठाण चौकात, रिक्षा स्टॅण्डजवळ, चाकण चौक येथे थांबलेले असून, त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहे.

खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून, आरोपी नामे राहुल शहादेव माने (वय २३ वर्षे, रा.अमृत कॉलनी, बालाजीनगर, चाकण, पुणे) यास ताब्यात घेवून, त्यांचे ताब्यातून ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ राऊंड जप्त केले. आरोपी विरुध्द चाकण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९२०/२०२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान त्याचा साथीदार आरोपी तुषार बाबासाहेब मस्के (वय २३ वर्षे रा. हनुमान मंदीरासमोर, गवळवाडी, सराटा, बीड) यास अटक करुन, त्याच्याकडे पोलिस कोठडी दरम्यान कौशल्य पुर्ण तपास करुन, त्यांचेकडून ०२ पिस्टल व ०४ राऊंड हस्तगत करुन, जप्त करण्यात आले.

नमूद गुन्हयात आता पर्यंत १,५३,००० /- रुपये किंमतचे ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलेली आहेत. आरोपी राहुल माने हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गुन्हे दाखल आहे. त्याचेवर मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे.

सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे पोलिस सह आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलिस उप निरीक्षक रमेश गायकवाड तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार निशांत काळे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, चंद्रकांत जाधव, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे व भरत गाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पिंपरीमध्ये दोघांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने चिरडले अन्…

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!