जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…
सांगली : जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला मंगळवारी (ता. ७) दुपारी झालेल्या अपघातात सांगली जिल्ह्यातील सुपुत्र पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जबलपूरहून बंगलोरच्या दिशेने लष्कराचे वाहन येत होते. त्यावेळी एका खासगी टँकरने लष्कराच्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये लष्कराच्या वाहनातील एक जवान ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी आहे. जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याचा अगोदर पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली.
पोपट खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोपट खोत यांच्या पार्थिवावर गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!