
पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…
पुणे : नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे. आरोपीला अत्याचार करताना 4-5 मुलांनी अडवण्याचा प्रयत्नही केला असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा त्याने प्रत्यक्षदर्शी मुलांना दगड भिरकावून पळवून लावल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. प्रत्यक्षदर्शी मुलांवर दगड फेकून मारल्याचा महत्वाचा सीसीटीवी पोलिसांनी जप्त केला असून त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई-साक्ष देखील नोंदवून घेतली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तपासालाही गती मिळाली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
आरोपीला आज (मंगळवारी, ता. १२) ऑनलाईन पध्दतीने न्यायालयात हजर करण्यात आले, यावेळी त्याला आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नसरापूर घटनेतील आरोपीला 14 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपीला आज ऑनलाइन पद्धतीने कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने विचारलं, पोलिसांविरोधात तक्रार आहे का? त्यावर आरोपीने, नाही, असे उत्तर दिले. संपूर्ण युक्तिवाद पार पडल्यानंतर 24 मे पर्यंत आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. नसरापूर प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे आणि जलदगतीने पार पाडण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजय मिसर यांनी संपूर्ण प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. यासाठी अजय मिसर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी ग्रामीण पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावेळी तपास पथकाने आत्तापर्यंत केलेल्या तपासाचा आढावा अजय मिसर यांनी पोलिसांकडून घेतला आहे.
नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…
नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…
पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…
पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…

