पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील काळेपडळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांच्या मदतीने खून केल्याची घटना घडली आहे. काळेपडळ पोलिसांनी ४८ तासात आरोपींना जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत.

दिनांक ३/५/२०२६ रोजी गल्ली नं ५ हिंगणे बिल्डींग पार्कीगमध्ये ससाणेनगर हडपसर पुणे येथे आरोपी दुर्वांग मानकर साहील शेलार (वय २८ रा. ससाणेनगर हडपसर) व त्यांचे ०३ ते ०४ साथीदार यांनी फिर्यादीचे पती गणेश संजु बिरादार (वय २५ रा ग नं ६ ससाणेनगर हडपसर पुणे) यांचेसोबत ०३ महिन्यांपुर्वी झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी दुर्वांग मानकर व साहील शेलार यांनी फिर्यादी यांचे पतीस सिमेटचे ब्लॉकने डोक्यात मारुन इतर साथीदारांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन, गंभीर जखमी करुन ठार केलेबाबत काळेपडळ पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. २०१/२०२६ भा.न्या. स कलम १०३, १०९.३ (५) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासात मुख्य आरोपी दुर्वांग ऊर्फ पारस सुनिल मानकर हा सराईत गुन्हेगार असुन, त्यांचे ०५ साथीदार यांनी संगणमत करुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालील ०३ तपास पथके नेमली होती. दाखल गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदार व सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, सदर गुन्हयातील पाहिजे १) साहील सागर शेलार वय २४, रा. गल्ली नं.०५, ससाणे नगर, हडपसर पुणे, २) चंद्रशेखर सोमनाथ जावीर वय २०, रा. सुखसागर नगर, तुळजाभवानी मंदीर जवळ, कात्रज पुणे, ३) सुरज रमेश दोरकर वय २१, रा. गाळीतळ, कॅनल जवळ, हडपसर पुणे यांना शिताफीने ताब्यात घेवून, काळेपडळ पोलिस ठाणे येथे आणुन, गुन्हयाचे तपासकामी दिनांक ०७/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अजय हंचाटे, सहा. पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ सागर कवडे यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक काळेपडळ पोलिस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांचे सुचने प्रमाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे व पोलिस अंलदार प्रविण काळभोर, निलेश देसाई, दाउद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, परशुराम पिसे, राजु वाघमारे, शाहिद शेख, बालु ठाकुर, पोलिस अंमलदार अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदिप बेडीस्कर, गिरीराज जगदाळे, विशाल ठोंबरे, सद्दाम ताबोळी, राकेश सांळुखे, नितीन ढोले यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.

पुणे! सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत प्रियकराचं धक्कादायक कांड, दिल्या खेळण्यातील नोटा…

पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…

पुणे पोलिसांचे बुधवार पेठेतील महिलांना दोन प्रश्न अन् झाली पोलखेल…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

पुणे पोलिस दलातील पोलिसाचा प्रताप; कोम्बिंग ऑपरेशन कारण अन् पत्नीने पकडले रंगेहाथ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!