पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

पुणे : पुणे शहरात आर्थिक वादातून एका युवकाचे (वय ३१) कात्रज-कोंढवा येथून अपहरण करून त्याला विवस्त्र करत अमानुष मारहाण करण्यात आली. पीडिताचा व्हिडिओ बनवून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाला ३१ डिसेंबरच्या रात्री नऊ जणांनी गाठले. जुन्या आर्थिक व्यवहाराचा राग मनात धरून आरोपींनी पीडिताचे कारमधून अपहरण केले. गोकुळनगर परिसरातील एका निर्जन मैदानात नेऊन आरोपींनी त्याला विवस्त्र केले आणि बेदम मारहाण केली. शिवाय, मोबाईलवर चित्रीकरण करून, पोलिसात गेल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

दहशत माजवण्यासाठी आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून पीडिताला धमकावले आणि गोळीबारही केला. सुदैवाने, या हल्ल्यातून युवक थोडक्यात बचावला. या घटनेनंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या युवकाने रविवारी येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक खराडे पसार आरोपींचा शोध घेत आहेत.

पुणे! चिमुकली पाळण्यात निपचित पडलेली तर पत्नीच्या गळ्याला दोर…

पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद…

पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…

पुणे! आयुष कोमकरच्या आईचा ‘तो’ Video समोर; प्लिज, असं करू नका…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!