नाशिक! दाजीला झाला राग अनावर अन् घेतला मेव्हणीचा जीव…

नाशिक: कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेव्हणीचा दाजीने जीव घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घडली आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव तर श्याम माळी असे आरोपी दाजीचे नाव आहे.

आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मृत छाया जाधव या तिचे पती आई आणि भाऊ यांच्यासह भऊर फाटा येथे आल्या होत्या. सर्वांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आरोपी श्याम याने अचानक छाया यांच्या छातीवर चाकूने जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छाया यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भांडण सोडवताना छाया यांचा भाऊ सोनू कराटे याच्या दोन्ही हातांवरही चाकूचे वार लागल्याने तो जखमी झाला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, घटनेनंतर आरोपी श्याम माळी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, खामखेडा गावाचे लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत धाडसाने फरार आरोपी श्याम माळी याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी देवळा पोलिस अधिक तपास करत आहेत.

नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…

नाशिक शहरातील रुग्णालयात खळबळ, स्टाफ रुममध्ये नर्सचा मृतदेह…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!