धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

बुलडाणा : वडील आणि भावाने नवविवाहित युवतीचा खून केल्यानंतर पोलिसांनी बाप आणि भावाला अटकही केली. पण, अचानक मृत युवती पोलिस स्टेशनला पोहोचली आणि मी जिवंत असल्याचे सांगू लागली. हे पाहून पोलिसांनी चांगलाच धक्का बसला. मग, जळगावमध्ये सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात राजुरा जंगल परिसरात शिरच्छेद झालेल्या अवस्थेत सापडलेल्या युवतीच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. खून झालेली युवती चक्क जिवंत पोलिस स्टेशनला पोहोचली आहे. मुलीच्या हत्येच्या आरोपात अटक असलेल्या वडील आणि भावाला सोडण्याची मागणी युवतीने केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील खकणार येथून शिवानीच्या वडिलांना आणि भावाला खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली होती. या दोघांनी शिवानीच्या खुनाची कबुली देखील दिली. पण, आता मुलगी जिवंत असल्याचं समोर आले आहे. जळगावमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती, मध्य प्रदेशमधील खकणार इथं एक युवती बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. तिथे असं लक्षात आलं की, शिवानी नावाच्या मुलीचा तिच्या भाऊ आणि वडिलांनी खून केल्याची माहिती मिळाली. दोघांनी गुन्हाही कबूल केला होता. आता दोघांनी कबुली दिल्यामुळे दोघांना अटक केली. जळगावमध्ये ज्या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता, त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होते. त्याचा डीएनए तपासणीसाठी दिला होता. अनोळखी महिलेचा ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होते. पण, खकणार पोलिस स्टेशनमधून पोलिस निरिक्षक अभिषेक जाधव यांचा आम्हाला फोन आला. सदरील प्रकरणामध्ये शिवानी बापूराव करमेकर ही जिवंत असल्याचे सांगितले. त्या युवतीला आम्ही पोलिस स्टेशनला बोलावलं आहे, तिचा जबाब नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.

पण, या प्रकरणामध्ये आरोपींनी दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून खोटी माहिती देत आले, पोलिस कोठडीत असताना आणि न्यायालयाामध्ये हजर केले असता त्यांनी खोटी माहिती दिली असल्याचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जळगाव जामोदमध्ये सापडलेला मृतदेह कोणाचा आहे, तिला मारणारे मारेकरी कोण? शिवानीच्या वडील आणि भावाने खुनाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर का घेतला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…

पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…

महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् गेली; हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली…

पोलिस कॉन्स्टेबल नको त्या अवस्थेत पकडले; पुरावे दाखवताच तत्काळ निलंबित…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!