
लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट! युवकाला भरबाजारात सपासप वार करून संपवलं…
अकोला : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या मामासह चार जणांनी मिळून एका युवकाची भरबाजारात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या असून, त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
राहुल कालू सारसर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुलने आरोपीच्या भाचीसोबत तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला होता. हाच राग मुलीच्या मामाच्या मनात होता. याच वादातून १५ मे रोजी अकोला शहरातील अलंकार मार्केटमध्ये आरोपींनी राहुलला गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी राहुलवर लोखंडी पाईप आणि तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले. या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला. भरबाजारात झालेल्या या हत्येमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरले होते.
View this post on Instagram
रामदास पेठ पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या तपास सुरू केला.
मुख्य आरोपी बादशहा सरु पारोचे (वय ३५ वर्ष, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) हा शहरातून फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर उर्वरित तीन आरोपी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात लपल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…
हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…
सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार: सायली सुर्वे
लातूर हादरलं! प्रेमप्रकरणातून वाद अन् इंस्टाग्रामवरून धमक्या; सुसाईड नोटमध्ये…

