भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या २२ दिवसांपासून असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने त्यांना 23 एप्रिल रोजी पकडले होते. मात्र, आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडले आहे. आज (बुधवार) सकाळी साडेदहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरुन पी.के. शॉ माघारी परतले.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

दरम्यान, भारत-पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या 22 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते.

नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के. शॉ यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. 23 एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते.

पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ हे कडक ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ यांची सुटका होऊ शकली नव्हती.

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

अवर जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट टू काऊंट बॉडी बॅग्ज!

Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…

India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…

Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…

जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…

पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…

India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!