
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत केली रेकी…
मुंबई: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत अनेक वेळा भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे संवेदनशील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचं राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींच्या तपासात उघड झाले आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
ज्योती मल्होत्रा जुलै ते सप्टेंबर २०२४ दरम्यान किमान तीन वेळा मुंबईला आली होती. तिने ट्रेन आणि लक्झरी बसेसने हा प्रवास केला होता. या भेटींदरम्यान तिने व्हिडीओ आणि फोटोंद्वारे विविध भागांचे विस्तृत दस्तऐवजीकरण केले. यातील काही पुरावे आता मोबाइल आणि लॅपटॉपमधून जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत तिचे वास्तव्य कुठे आहे याची सध्या चौकशी सुरू आहे.
ज्योती मल्होत्रा हिने सप्टेंबर २०२३ मध्ये दुसऱ्यांदा मुंबईला भेट दिली होती. तेव्हा ती नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून पंजाब मेलने मुंबईला आली होती. विशेष म्हणजे तिने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये उल्लेख केला की, फाळणीपूर्वी पंजाब मेल मुंबई ते पेशावर अशी जोडली जात होती. तिने सीमेपलीकडील प्रेमाचं प्रतीक म्हणून ही ट्रेन निवडली होती. मुंबईला येताना आणि मुंबईत आगमन झाल्यानंतर तिने विविध संवेदनशील ठिकाणांचे चित्रिकरण केले आहे.
जुलै २०२४ मध्ये, मल्होत्राने मुंबईला पोहोचण्यासाठी लक्झरी बसने प्रवास केला आहे. या भेटीची माहिती तिच्या लॅपटॉप आणि मोबाईल उपकरणांच्या डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषणातून समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी विशेष डेटा रिकव्हरी टूल्स वापरून नंतर हटवलेल्या मीडिया फाइल्स रिकव्हर केल्या आहेत. या फायलींमध्ये मुंबई, पहलगाम आणि कदाचित इतर संवेदनशील ठिकाणांवरील दृश्ये समाविष्ट आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानमध्ये कोणाला मिळाले आणि ते एका व्यापक हेरगिरी मोहिमेचा भाग होते का? याची तपासणी अधिकारी करत आहेत.
ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानसाठी कथित हेरगिरी केल्याची चौकशी सुरू असताना गुप्तचर संस्थांना तिच्या मुंबईतील आणखी एक संशयास्पद भेटीबाबत माहिती मिळाली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान तिने मुंबईला भेट दिली होती. तिने मुंबईचा राजा गणेश गल्ली आणि लालबागचा राजाला भेट दिली होती. तिने दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दीचे, स्थानिक लेआउट, प्रवेशद्वार आणि आजूबाजूच्या ठिकाणांचे विस्तृतपणे चित्रीकरण केले आहे. त्यामुळे सॉफ्ट टार्गेट म्हणून मुंबईवर दहशतवाद्यांचा निशाणा होता का? याचा सविस्तर तपास केला जात आहे.
धक्कादायक माहिती! हेरगिरी बदल्यात ज्योती मल्होत्राला पाकने किती रुपये दिले…
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर…
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…
सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…
पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…
Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…
अवर जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट टू काऊंट बॉडी बॅग्ज!
Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…
India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…
Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…
जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

