माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…

अहमदनगर: बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांसह एक स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. माजी आमदाराने त्यामधील 25 हजार रुपये दिल्याचे पोलिस तक्रारीतून समोर आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली असून, अहमदनगर पोलिस कसून तपास करत आहेत.

एका माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यात आले. एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खंडणीच्या रकमेपैकी २५ हजार रुपये अहमदनगरमधील एका यू ट्यूब चॅनेलच्या पत्रकाराने स्वीकारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित महिलांशी तडजोड करून देण्याची ऑफर देत बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला खंडणी मागण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, कोणतीही व्यक्ती जर अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल तर तातडीने अहमदनगर पोलिस किंवा कोतवाली पोलिस ठाण्याचे संपर्क साधावा असे, आवाहन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत संबंधित युट्युब चॅनलच्या बोगस पत्रकाराला आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. आरोपी कल्पना सुधीर गायकवाड, बांगर नावाची महिला (संपूर्ण नाव माहिती नाही), इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याने पंचवीस हजार रुपये रक्कम संबंधित माजी आमदाराचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून स्वीकारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन; धमकीत म्हटले की…

भाजप नेत्याची पोलिसांना धमकी, व्हिडिओ व्हायरल…

छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!