ज्योती मल्होत्रा हिची कबुली; होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते…

नवी दिल्लीः पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ज्योती मल्होत्रा अटक केल्यानंतर तिने आयाएसआयशी संबंधांची कबुली दिली आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली आहे.

पाकिस्तानात अली हसन याने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर ‘जट रधाँवा’ नावे केला सेव्ह होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली ज्योती मल्होत्राने दिली आहे. तसेच दानिशच्या मदतीने केल्या पाकिस्तानच्या दोन फेऱ्या मारल्याचे ज्योती मल्होत्रा हिने म्हटले आहे. मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे.

पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याने ज्योतीला डिनरसाठी आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये संवाद झाला आणि ज्योतीने एक व्हिडीओही रेकॉर्ड केला. नंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत होती. तिचा पाकिस्तान दौरा देखील स्पॉन्सर केलेला होता. ज्योतीशी संबंधित अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.

ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यामधील एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. त्यात अटारीवर एखाद्या अंडर कव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर आयएसआयने सोपवलं होतं हे दिसून येत आहे. अंडर कव्हर एजंटला भूलवून त्याला एका गुरूद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं या चॅटमधून उघड होत आहे. पाकिस्तानी आयएसआय ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचे हे पुरावे आहेत. ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरणीला लिहिली होती. ‘सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी।’ असं ज्योतीने या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव यू.. खुश-मुश, असे लिहिले आहे.

दरम्यान, युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही सामान्य घरातील मुलगी आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमावण्याची इतकी घाई होती की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने त्वरित नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली होती.रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. मात्र, तिने तिथेही फार काळ काम केले नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खाजगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले.

धक्कादायक माहिती! हेरगिरी बदल्यात ज्योती मल्होत्राला पाकने किती रुपये दिले…

पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर…

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

अवर जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट टू काऊंट बॉडी बॅग्ज!

Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…

India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…

Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…

जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!