
अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…
मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल संघाची मालकिन प्रीती झिंटा हिने हुतात्मा जवानांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 1.10 कोटी रुपयांची भरीव देणगी दिली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रीती झिंटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरित्या राबवले होते. या घटनेच्या काही दिवसांनंतर, प्रीती झिंटाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.प्रीती झिंटा हिने या देणगीबद्दल एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, आयपीएल संघ ‘पंजाब किंग्स’च्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत दक्षिण पश्चिमी कमांडच्या ‘आर्मी वाईव्ह्स वेल्फेअर असोसिएशन’ (AWWA) ला एकूण 1.10 कोटी रुपयांची रक्कम दान केली आहे.
जयपूर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रीती झिंटा हिने म्हटले की, ‘आपण आपल्या जवानांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कधीच चुकवू शकत नाही. परंतु, एक नागरिक म्हणून, आपण सर्वांनी त्यांच्या कुटुंबांना शक्य ती सर्व मदत केली पाहिजे. आम्हाला भारतीय सशस्त्र दलांचा खूप अभिमान आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या आणि आपल्या शूर जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
दरम्यान, या कार्यक्रमाला दक्षिण पश्चिमी कमांडचे सेना कमांडर, AWWA च्या प्रादेशिक अध्यक्षा आणि अनेक सैन्य कुटुंबियांनी उपस्थिती लावली होती. या प्रसंगी प्रीती झिंटा हिची उपस्थिती लक्षवेधी ठरली. शिवाय, मदतीचा हात पुढे केल्यामुले सैन्य कुटुंबांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली आहे.
View this post on Instagram
अभिनेता सलमान खान याच्या घरात मध्यरात्री युवतीने केला घुसण्याचा प्रयत्न; युवती कोण पाहा…
Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…
Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

