सरकारी महिला अधिकाऱ्याची भोसकून हत्या…
बंगळुरु : वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) घडली आहे. केएस प्रतिमा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कर्नाटक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होत्या. या प्रकरणी पोलिसांनी किरण या आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
किरण हा कर्नाटक सरकारमध्ये कंत्राटी कर्मचारी होता. प्रतिमा यांनी किरण याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन बर्खास्त केले होते. तो राग किरणच्या मनात होता. त्याचा रागातून त्याने केएस प्रतिमाची हत्या केली. प्रतिमा यांची हत्या करुन किरण चामराज नगर जिल्ह्यात पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून अटक केली आहे.
बंगळुरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रतिमा हत्या प्रकरणी एका संशयिताला माली महाडेश्वर हिल्स येथून ताब्यात घेतले आहे. दक्षिण बंगळुरुचे डीसीपी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. आरोपी ड्रायव्हरचे काम करायचा. किरण कॉन्ट्रॅक्टवर होता व त्याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकले होते. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.’
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…
महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! संतपत्तीवरून दोन बहिणींची केली हत्या…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!