
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण…
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेल भाग्यश्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. २३) सायंकाळी घडला आहे. अज्ञात कारमधून आलेल्या ४ ते ५ आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण केले आणि त्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली. गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ जात त्यांनी मडके यांना गाडीत ओढले.
गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली. हॉटेलकडून ही गाडी धाराशिवकडे नेण्यात आली. पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पूलावर फेकून दिले. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे नागेश मडके यांनी सांगितले.
दरम्यान, हॉटेल भाग्यश्रीवर मागील महिन्यात हल्ला करून काही अज्ञातांनी तेथील पोस्टर फाडून टाकले होते. तसेच मागील आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी होत आहे. काही महिन्यापासून चर्चेत आलेल्या या हॉटेलमध्ये सध्या बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील हॉटेलच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीमंत घरातील मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; पावतीमुळे अलगद अडकले…
साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…
बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा…

