
चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…
धाराशिव: धाराशीव जिल्ह्यातील कळंब येथे मनीषा बिडवे (वय 39) या महिलेचा राहत्या घरात लोखंडी हातोडीने मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली, याची माहिती समोर आली आहे.
मनीषा बिडवे यांचे घर बाहेरून कुलूपबंद असल्याचे दिसले. घराच्या परिसरात सडल्याचा उग्र वास येत होता. यावेळी पोलिसांनी मागील बाजूस जाऊन खिडकीतून पाहिले असता, एक सडलेले प्रेत आढळून आले. पोलिसांना तपासादरम्यान मृत महिलेची ग्रे रंगाची हुंदाई कार आढळली. गाडीवर चाव्यांचा गुच्छ ठेवला होता. त्यातील एका चावीने घराचे कुलूप उघडून पाहणी केली असता, प्रेत आळ्या लागलेल्या अवस्थेत सापडले. मृत महिलेचा भाऊ महालींग बिडवे यांनी तिची ओळख पटवली. या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.
मनीषा बिडवे यांचे ड्रायव्हर असलेल्या रामेश्वर उर्फ राम्या माधव भोसले याच्याशी प्रेमसंबंध होते. मनीषाने त्या संबंधांचे काही फोटो आणि व्हिडीओ शूट केले होते. यातून ती रामेश्वरला ब्लॅकमेल करत होती. 5 लाख रुपये दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी मनीषा बिडवे यांनी दिली होती. याच कारणातून आरोपी ड्रायव्हर रामेश्वर याने आपली मालकीण मनीषा बिडवे यांचा खून करायचे ठरवलं. रामेश्वरने रागाच्या भरात लोखंडी हातोडीने तिच्या डोक्यात वार करून खून केला.
मनीषा बिडवे यांचा खून केल्यानंतर रामेश्वरने उस्मान गुलाब सय्यद या साथीदाराला घटनेची माहिती दिली. उस्मान सय्यद याने आरोपीला स्वतःच्या घरी लपवून ठेवले आणि पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 249 आणि 239 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या महिलेचे संतोष देशमुख प्रकरणाशी देखील संबंध जोडले जात आहेत. देशमुखांना अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता, असा दावा सोमवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यामुळे या हत्येमागे अनैतिक संबंधाचं कारण आहे की राजकीय याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, कळंब पोलिसांत या दोघांविरोधात पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी महिलेच्या दोन मारकेऱ्यांना केलेली अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…
प्रेमकहाणीचा ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने झाला शेवट…
पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…
बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…
बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

