सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…

धाराशिव: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे आज (शनिवार) गाडीचे टायर्स फुटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन आज सकाळी जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर्स फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली.

क्रुझरला झालेल्या अपघातानंतर आजुबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. काही नागरिकांनी जोर लावून क्रुझर गाडी सरळ करुन त्यामधून मृतदेह बाहेर काढले. अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुले मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे. या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.

क्रुझर गाडीचे टायर्स फुटल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन एका ट्रॅक्टरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. काही नागरिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढून बाहेर रस्त्यावर ठेवले आणि त्यानंतर गाडी सरळ करुन इतर जखमींना बाहेर काढले. सध्या पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. अपघाताच्यावेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू आणि तब्बल 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे! गौतमी पाटील हिच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात…

पुणे जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ महिलांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!