पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे: पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित युवती शिक्षण घेत आहे. आरोपी देखील याच महाविद्यालयात 11वी, 12वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन युवक अल्पवयीन आहेत. पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या “गुड टच बॅड टच” या उपक्रमातून ही घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार एप्रिल पासून घडत आला आहे. पीडित युवती तिच्या वडिलांच्या फोन वरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला. या संबधीचे व्हिडिओ देखील आरोपींनी काढल्याची माहिती आहे.

दरम्यान, आरोपी युवक हे एकमेकांना ओळखत नाहीत. पीडित युवतीला भेटण्यासाठी एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले, तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर 2 युवकांनी सुद्धा तिच्याशी अनेक ठिकाणी सबंध ठेवल्याची माहिती आहे. ही सर्व घटना पिडीत युवतीने तिच्या मैत्रिणीला सांगितली. शिवाय, महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पालकांनी पोलिसात धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संबंधित घटना समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. “कोरेगाव पार्कमध्ये अल्पवयीन मुलांनी केलेल्या ड्रग्जपार्टीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची बातमी वाचली. ही अतिशय धक्कादायक आणि पुणे पोलीसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना आहे. अकरावी-बारावीच्या मुलांना नशा करण्यासाठी ड्रग्ज उपलब्ध होते, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणी महाविद्यालयाचे विश्वस्त आणि पोलीस प्रशासनाने घेतलेली बोटचेपी भूमिका…. ! ज्यांनी कायद्याचे रक्षण केले पाहिजे, नव्या पिढीला शिस्त लावण्याचे काम केले पाहिजे तेच अशी गंभीर प्रकरणे दडपण्याचे काम करतात हे महाराष्ट्र पोलीस आणि शिक्षण क्षेत्राच्या लौकीकाला साजेसे नाही.’

काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त करत पत्र लिहले आहे. “कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अश्या घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात. आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही आशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही.’

पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…

पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!