अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

पुणे: ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
श्री. अशोक इंदलकर हे पोलिस दलात ३० वर्षे कार्यरत आहेत. कुटुंबाला ऐतिहासिक वारसा लाभलेले इंदलकर यांनी अनेक खतरनाक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. या कार्याबद्दल खात्याचे १०० हून अधिक बक्षिसे त्यांना मिळाली आहेत. धडाकेबाज पोलिस अधिकारी, आंतरराष्ट्रीय लेखक, इतिहासाची आवड आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले अधिकारी म्हणजे अशोक इंदलकर. त्यांच्याविषयी थोडक्यात…

अशोक इंदलकर यांचे सातारा जिल्ह्यातील कळंबे हे गाव. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सहकारी हिरोजी इंदलकर यांचे थेट वंशज. यामुळे इतिहासाची त्यांची नाळ जोडलेली. इयत्ता चौथीपर्यंत कळंबे गावात शिक्षण झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सातारा आणि पुढील शिक्षण मुंबईत झाले. अशोक इंदलकर यांचा सामान्य कुटुंबातील जन्म. पोलिस दलाचा कोणताही वारसा नाही. पण, पोलिस अधिकारी होण्याचे एक स्वप्न होते आणि ते पूर्ण केले सुद्धा.

श्री. इंदलकर यांना लहानपणापासूनच लिखानाची आवड. इयत्ता चौथीमध्येच असताना त्यांनी एक नाटक लिहिले आणि ते बसवलेसुद्धा. शाळेत असतानाच लिखानाची, वाचनाची लागलेली आवड त्यांनी आजही जोपासली आहे. त्यांचे लिखान सातत्याने सुरू असते. विविध दैनिकांमधून, मासिकांमधून, ऑनलाइन क्षेत्रातून त्यांचे अनेक लेख सातत्याने प्रकाशीत होत आहेत. कॉलेजमध्ये असतानाही त्यांनी अनेक कथा, लेख, प्रवास वर्णनं लिहिली आहेत. पोलिस दलात असतानाही तीन पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

शिक्षणः 
सातारा येथून दहावी झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठामधून इतिहास विषयातून बी.ए. ऑनर्स पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. रूपारेल न्यू कॉलेजमधून एलएल.बी.चे शिक्षण घेत होते. एलएल.बी.च्या दुसऱ्या वर्षाला असताना एमपीएससीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. १९९२ मध्ये त्यांची पीएसआयपदी निवड झाली….

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…

‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!