तुळजापूरमधील सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव; पोलिस तपासात कारण समोर…
धाराशिव: तुळजापूरमधील सरपंचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली होती. पण, सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सरपंचाने बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सत्ता वर्चस्व दाखवण्यासाठी पिस्तूल, गन बाळगण्याचे लायसन्स मिळवण्यासाठी वाटेल […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, जाळण्याचा प्रयत्न…
धाराशिव: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. नामदेव […]
अधिक वाचा...धक्कादायक! आईने घरात घेतला गळफास तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये…
धाराशिव: घरातील पत्र्याला गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली असून, घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्ही लहान मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव असून, श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटना […]
अधिक वाचा...धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…
धाराशिव : एका चार वर्षांच्या चिमुकलीवर 52 वर्षाांच्या परप्रांतीय व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जमावानं आरोपीला चांगलाच चोप दिला असून, त्याच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित चिमुकलीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार वर्षांच्या चिमुकलीवर 52 […]
अधिक वाचा...अतुल कुलकर्णी यांच्या पहाट उपक्रमाची न्यायालयाकडून दखल!
धाराशिव (प्रतिक भोसले): धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या पोलिसांच्या पहाट उपक्रमाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुप्ता यांनी दखल घेतली आहे. ढोकी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील नऊ आरोपींची तीन महिन्यात आठवड्यातून तीन दिवस पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर निर्दोष मुक्तता केली. शिवाय पहाट उपक्रमांतर्गत आरोपींना गुन्हे करणे पासून परावृत्त करण्याकरीता व […]
अधिक वाचा...उत्पादन शुल्क विभागाची उमरगा मध्ये कारवाई; न्यायालयाने केला दंड वसूल…
धाराशिव (प्रतिक भोसले): उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागाने अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली आहे. पुढे न्यायालयाने दंड वसूल केला आहे. उमरगा बसस्थानका शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू ग्राहकांना विक्री करण्यासाठी सार्वजनिक गुत्ता उघडलेला असल्याबाबतची खात्रीलायक माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सिमा तपासणी नाका, उमरगा या कार्यालयाने गणेश […]
अधिक वाचा...धाराशिवमध्ये भरदिवसा कर्मचाऱ्यांना बांधून बँक लुटली…
धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून आणि कर्मचाऱ्यांना बांधून दरोडा घातला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत. धाराशिव शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या […]
अधिक वाचा...पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत
धाराशिव (प्रतिक भोसले): धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन जिल्ह्यात वृक्ष चळवळ राबवत आहेत. वृक्षलागवड आणि संवर्धन करून जनजागृती करत एक हरितक्रांतीची चळवळ गतिमान केल्याबद्दल त्यांचा शनिवारी (ता. २६) पद्मश्री कल्याण सिंह रावत (देहरादून) प्रमुख मैती आंदोलन (माहेर वृक्ष चळवळ), उत्तराखंड यांच्या हस्ते ‘वृक्ष निधी सन्मान पत्र’ देऊन सत्कार […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…
धाराशिव (प्रतिक भोसले): राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरतीची तयारी करणाऱ्या बालाजी बळीराम भंडारे (वय ३४, रा.वाडी बामणी, ता. जि. उस्मानाबाद (धाराशिव) यांनी घरमालकीनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घर मालकीण असलेल्या शुभांगी नंदु जगताप या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. महिलेच्याच बेडरूम मध्ये १० ऑगस्ट […]
अधिक वाचा...महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
धाराशिव : मलकापूर (ता. कळंब) येथील स्वयंघोषित महाराज एकनाथ सुभाष लोमटे यांना येरमाळा पोलिसांना अटक केली आहे. आले आहे. धाराशिव दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे. दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे एकनाथ […]
अधिक वाचा...
