
सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल…
घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ जिल्हा पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेले उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार (SDPO) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 13 (1) (ब), 13 (2), 12 नुसार अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे (नांदेड), अपर पोलिस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक प्रशांत पवार, पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर (तपास अधिकारी) आदींनी केली. या मुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
लोकसेवक तथा सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी (SDPO) हे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, उमरखेड व वणी येथे उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते 2024 मध्ये पोलिस खात्यातुन निवृत्त झाले. शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर 1 मे 1998 ते 31 मार्च 2019 या कालावधीत संपादीत केलेल्या मालमत्ते बाबत त्यांचे विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे परिक्षण (INQUIRY) करण्यात आले. तसेच या प्रकरणात मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे खुली चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार (SDPO) यांना अनेक वेळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संधी दिली. मात्र, त्यांनी संपादीत केलेल्या मालमत्ते बाबत पुष्टीदायक पुरावे ते ACB ला सादर करु शकले नाही.
कायदेशीर उत्पनापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व त्यांच्या पत्नीच्या नांवे संपादीत केल्याचे खुल्या चौकशीत उघड झाले. त्यांनी संपादीत केलेली 28 लाख 74 हजार 146 रुपये किंमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पनाच्या तुलनेत 16.65 टक्के जास्त असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व पत्नी मनीषा संजय पुज्जलवार (मु. आमदार नगर, मालेगांव रोड, नांदेड) यांचे विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष गुर्जर (मुंबई) यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर (नांदेड) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिकारी पुढील तपास करीत आहे.
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…
निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

