
लाखो रुपयांची लाच पडली महागात; PSI प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ…
पुणे: दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना “पैसा दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या फसवणुकीचा आकडा तब्बल 5 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. पीडित नागरिकांनी भोसरी पोलीस ठाण्यात या बाबत तक्रारी केल्या असून, आर्थिक लाभासाठी चिंतामणी याने फसवणुकीचे पैसे स्वतःच्या मेहुण्याच्या बँक खात्यावर जमा करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 2 नोव्हेंबर रोजी दोन कोटींची लाच मागणाऱ्या चिंतामणीला जाळ्यात ओढले होते. ACB ने सापळा रचून 46 लाख 50 हजार रुपये लाच स्वीकारत असताना प्रमोद चिंतामणी याला रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर त्याच्या घरी झडती घेण्यात आली असता आणखी 51 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. लाच प्रकरणाच्या वेळी चिंतामणी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता.
दोन कोटींच्या लाचप्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या संबंधीचे आदेश पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी जारी केले आहेत. प्रमोद चिंतामणीच्या विविध गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात…
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मिळालं मोठं घबाड…
पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन् मिळालं मोठं घबाड…
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

