
लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…
लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी (ता. १९) एका सात वर्षांच्या चिमुकल्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, सख्या चुलतीनेच सात वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि तिला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी आरोपीने स्वतःसह दिराच्या मुलांचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. याच रागातून तिने आपल्या सात वर्षीय पुतण्याचा खून केला आणि तो आरोप पतीच्या प्रेयसीवर लावून तिला अडकवण्याचा कट रचला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने तिने पुतण्याचा मृतदेह एका पडक्या वाड्यात टाकून दिला, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
चाकूर येथील साईचरण दिनेश स्वामी (वय १०) व देवांश मंगेश स्वामी (वय ७) हे दोन सख्खे चुलत भाऊ रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. यामुळे फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी पोलिसांना मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली. यावरून पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध सुरू केला. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळील उजळंब रोड परिसरातील एका पडक्या जागेत, ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश स्वामी याचा मृतदेह आढळून आला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलिस ठाण्याच्या पथकांनी वेगाने तपास सुरू केला. यावेळी फिर्यादीची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे, साधारण दोन-अडीच तास ती घराबाहेर असणे आणि चौकशीदरम्यान विसंगत माहिती देणे, यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून विचारपूस केली असता तिने गुन्हा कबूल केला.
याप्रकरणी पोलिसांनी अनिता स्वामी हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात तिला आणखी कोणी सहकार्य केले आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…
लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…
लातूर! फ्रेशर्स पार्टीत डान्स करताना एकमेकांना धक्का लागला अन् जीव गेला…
लातूर! प्रियकरासोबत केला लॉजवर प्लॅन अन् पती दिसताच…
लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

