बीडच्या कारागृहातली सुदर्शन घुलेची दहशत; आमचे कोणीही वाकडं करु शकत नाही…

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारागृहात असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी कारागृहातील कैद्याला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यावरून खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा कारागृहातील बंदीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कारागृहामध्ये मारहाण झाल्याचे नातेवाईकांना सांगतानाची कॉल रेकॉर्डिंग आहे. कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा या कॉलमध्ये केला आहे. अजहर अब्दुल पठाण असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव असल्याचे कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर शेफ यांनी मला मारहाण केली. माझा हात उखडला आहे, उपर की हड्डी निकल आयी है… कॉल रेकॉर्डिंगमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपने खळबळ उडाली आहे.

जेलमधील पोलिस माझं ऐकत नाहीत.. त्यांच्याशी मिळाले आहेत. पैसे घेतले त्यांनी मला न्याय देत नाहीत, जेलरला सांगितले पण तो त्यांच्याच माणूस आहे. पहिला जेलर चांगला होता त्याची यांनीच बदली केली. चांदणे साहेबाना सुप्रिटेंड यांनीच बनवले आहे. ते माझं ऐकत नाही, उलट मलाच धमक्या देत आहेत. तुझी जेल बदली करू अस म्हणत आहेत तर माझ्या घराच्या लोकांना फोन करून धमक्या देत आहेत. आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही. संतोष देशमुख करून टाकील अशी धमकी दिली.. मी कोर्टाला सांगेल अस म्हटलं तर कोणाला सांगायचं ते सांग आमचे कोणीही वाकडं करु शकत नाही अस सांगत आहेत. मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. किती लोक मारतात ते मला दवाखान्यात पण घेऊन गेले नाहीत. जेलर आणि सगळे कर्मचारी त्यांना मिळाले आहेत. मला न्याय द्या. जागेवरून उठ म्हणून मारहाण केली. आम्ही 6 नंबरच्या बराकमध्ये आहे, त्याची खूप दहशत असून कर्मचाऱ्यांनीही धमक्या देतात. मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली, असा उल्लेख करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहामध्ये झालेल्या कथेत मारहाण आणि ऑडिओ क्लिप संदर्भात कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांना विचारले असता, कारागृहात बंदींची शाब्दिक बाचाबाची झाली होती. सहा नंबरच्या बराकमध्ये हे सगळी कैदी होते. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. यासंदर्भात दोन्ही कैद्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार नाही अशी लेखी दिले आहे. मारहाणी संदर्भात कुठलाही प्रकार घडला नाही, अशी फोनवरून माहिती दिली. मात्र कारागृहामध्ये झालेल्या घटनेमुळे आणि कॉल रेकॉर्डिंगमुळे खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप निश्चित…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!