परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे करणार म्हणत खुर्चीवर बसवलं अन्…

बंगळुरू: एका युवतीने प्रियकराला घरी बोलवत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. नव्या पद्धतीने प्रपोझ करणार आहे सांगत डोळे पट्टीने झाकले आणि त्याला खुर्चीला बांधले. त्याच बांधलेल्या अवस्थेत तरुणीने त्याला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर जिवंत जळत असताना त्याचा व्हिडीओ काढला आणि त्याला जिवंत मरताना पाहिले. प्रियकर दुर्लक्ष करत असल्याने युवतीने हे कृत्य केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्रेरणा आणि किरण दोघेही 27 वर्षांचे आहेत. ते दुकानात एकत्र काम करत होते. किरण आपल्याकडे हवं तितकं लक्ष देत नसल्याने प्रेरणा नाराज होती. तो आपल्याशी लग्न करु इच्छित नसल्याचंही तिला वाटत होते. प्रेरणा बंगळुरूच्या अंजनपुरा येथे वास्तव्यास आहे. ती आई आणि भावासोबत राहते. मंगळवारी घरी एकटी असताना तिने किरणला घरी बोलावले होते. किरण पोहोचल्यावर, दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर तिने किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि एका खुर्चीवर बसवले. हे सगळं करत असताना ती मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होती.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, प्रेरणाने हात बांधण्यास सुरुवात केली असता किरणने आधी आक्षेप घेतला. यानंतर तिने आपण ज्याप्रकारे परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे तुला प्रपोझ करणार असल्याचे सांगितले. हात-पाय बांधलेल्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत किरण प्रपोझची वाट पाहत होता. तर दुसरीकडे प्रेरणा हत्येची तयारी करत होती. प्रेरणाने आधीच ज्वलनशील पदार्थ आणला होता. तो तिने त्याच्या अंगावर ओतला आणि लगेचच पेटवून दिले.

पोलिसांनी याप्रकरणी प्रेरणाला बेड्या ठोकल्या आहेत. दोघांचे प्रेमसंबंध होते आणि तो आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे तिले वाटत होते,” असे पोलीस उपायुक्त डी.एल. नागेश यांनी सांगितले आहे.

प्रियकर आणि प्रेयसीने ठरवून कालव्यात मारली उडी; पण खरा ट्विस्ट तर पुढे…

प्रेयसीचा लग्नास नकार दिल्याने प्रियकराने घेतला जगाचा निरोप; मृतदेहाजवळ फोटो…

संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर भर दिवस चिरला प्रेयसीचा गळा…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!