
पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची संचालक पदावर निवड…
पुणेः पोलिस सोसायटी संचालक पदावर पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वातंत्र पूर्व काळात २० जुन १९२० रोजी पोलिसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलिस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संस्थेची व्याप्ती वाढत जावून आजतयागत संस्थेचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, सीआयडी, एसआयडी, ॲन्टी करप्शन ब्युरो, एसआरपीएफ, वायरलेस, पोलिस प्रशिक्षण केंद्र व इतर विभागातील पोलिस अधिकारी, अंमलदार व कार्यालयीन स्टाफ असे एकूण १४,३०० सभासद आहेत. संस्थचे अधिकृत भागभांडवल सुमारे ५०० कोटी रुपये असून संस्थेचा दरवर्षी ऑडीट वर्ग अ दर्जा आहे. संस्थेची सन २०२४-२०२९ कालावधीची पंचवार्षिक निवडणूक ६ मार्च २०२४ रोजी पार पडलेली आहे. त्यामध्ये नवपरिवर्तन पॅनल १२ विरुध्द १ असा बहुमताने विजयी होवून नवनिर्वाचित १३ उमेदवार निवडून आलेले आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
गुरुवारी २० जुन २०२४ रोजी संस्थेच्या १०४ वा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभासदांना अथर्व नेत्रालय अँड रिसर्च प्रा. लि. यांचेतर्फे नेत्रतपासणी व डायबेटीक असोशिएशन ऑफ इंडीया तर्फे मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याचा सेवानिवृत्त कर्मचारी व सभासद यांनी लाभ घेतला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सागर घोरपडे, उपाध्यक्ष आकाश फासगे, खजीनदार उदय काळभोर यांचे उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व संचालकांनी ठराव घेवून सर्वानुमते संस्थेचे सभासद महेश वसंतराव गायकवाड यांची ‘तज्ञ संचालक’ या पदावर बिनविरोध निवड केली.
नवनिर्वाचित तज्ञ संचालक महेश गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलिस दलात सायबर क्राईम या विभागात कार्यरत असून त्यांनी यापूर्वी लोणीकाळभोर पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा येथे आपले चांगले कार्याचा ठसा उमटविलेला आहे. त्यांना यापूर्वी पोलिस दलातील चांगले कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक देवूनही गौरविण्यात आलेले आहे. पोलिस सोसायटी कामकाजही ते उत्कृष्टपणे करतील याची खात्री असल्यानेच त्यांची या पदावर निवड केल्याचे दिसून येते.
दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिक वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी प्रामाणिक व गतिमान प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही नवनिर्वाचित संचालक महेश गायकवाड यांनी दिली.
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

