
पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील लोणी (ता. आंबेगाव) येथील विठ्ठलवाडी परिसराला पाणीपुरवठा पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. पारगाव (कारखाना) पोलिसांनी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
लोणी येथील अनिल आबाजी नाईक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 16/ 5/2024 दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस पाटील संदीप आढाव व मी आम्ही लोणी गावात जात असताना आम्हाला ओढ्यापाशी दुर्गंधीचा वास आल्याने आम्ही त्या वासाच्या दिशेने गेलो असता गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी जवळ चिंचेच्या झाडाखाली ओढ्याच्या बाजूला अंदाजे 35ते 40 वर्षे वयाचा व्यक्ती पडलेला दिसला. नंतर पोलिस पाटील संदीप आढाव यांनी पारगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे शवविच्छेदनसाठी घेऊन गेले. सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत.
पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…
पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

