नवी मुंबईतील पारसिक टेकडीवरून कार कोसळली थेट रेल्वे रुळांवर; चालक गंभीर जखमी…

नवी मुंबई: नवी मुंबईतील बेलापूरच्या पारसिक हिल परिसरात गुरुवारी टेकडीवरून जात असलेली एक कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि भरधाव वेगाने थेट रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने, ज्यावेळी ही कार टेकडीवरून खाली कोसळली, त्यावेळी तिथून कोणतीही लोकल ट्रेन जात नव्हती. या अपघातात कारचालक तरुण गंभीर जखमी झाला असून, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये वादळी पाऊस; वीज पडून दोन चुलत भावांचा मृत्यू…

नागपूर: नागपूर जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने शेतकरी असलेल्या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी येथे दिली. ही घटना शनिवारी रात्री मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिष्टी खुर्द गावात घडली. दोघेही शेतकरी असलेले पीडित जनावरांना पाजण्यासाठी शेतात गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता, ते गावातील एका मंदिरात […]

अधिक वाचा...

एकोणिसाव्या मजल्यावरून पडल्याने गुरुग्राममध्ये एक मजूर मृत्यूमुखी; तर दुसरा गंभीर जखमी…

गुरुग्राम: बाजघेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-११३ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या स्मार्ट वर्ल्ड बिल्डिंगच्या १९ व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. अपघातानंतर संतप्त कामगारांनी बिल्डर आणि कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी पाठवला […]

अधिक वाचा...

पुणे! नवले पुलाजवळ रात्रीच्या अंधारात पुन्हा ब्रेक फेल झाल्याने थरार…

पुणे : पुण्यातील अत्यंत धोकादायक आणि अपघातांचे केंद्र ठरलेल्या नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे तो भरधाव वेगात समोरील ट्रकला जाऊन धडकला. यामुळे तीन ट्रक एकमेकांवर आदळले. यावेळी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ३ […]

अधिक वाचा...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा; लेखकाचे अपघाती निधन…

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या मनोरंजनात्मक कार्यक्रमातील पडद्यामागचा कलाकार असलेले लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले आहे. याबाबत, लेखन टीममधील सचिन गोस्वामी यांनीच माहिती दिली. हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले. विजय कुमार विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनाचे बारकावे हेरणारे मराठवाड्यातील एक होतकरू लेखक […]

अधिक वाचा...

गणेश मिरवणुकीत कंटेनर शिरल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गणेशभक्तांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगरः गणेश मिरवणुकीत कंटेनर घुसून झालेल्या दुर्दैवी अपघातात, दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे. चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रिराजा गावाजवळ अपघातातची ही भीषण घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात सात वर्षांच्या चिमुकल्यासह अन्य १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पिंप्रीराजा गावाजवळ ही मिरवणूक रस्त्याने जात असताना अचानक कंटेनर त्यात घुसला. या […]

अधिक वाचा...

पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…

पुणे: पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉंगिंग करण्यासाठी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना शुक्रवारी (ता. ११) घडली आहे. या अपघातात वीरेंद्र द्विवेदी (वय 38) या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. विरेंद्र द्विवेदी हे […]

अधिक वाचा...

कोस्टल रोडच्या बोगद्यात कार आणि टॅक्सीची जोरदार धडक; वाहतूक ठप्प…

मुंबई: नरिमन पॉइंटवरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बोगद्यात, संध्याकाळी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार आणि टॅक्सीमध्ये जोरदार धडक झाली. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. ​अपघाताची माहिती मिळताच मुंबई वाहतूक पोलीस आणि […]

अधिक वाचा...

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खारेगावमध्ये अपघातात महिला मृत्यूमुखी; दोन पादचारी गंभीर जखमी…

ठाणे: कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव येथे एका भरधाव कारने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी पाटील असे मृत महिलेचे नाव असून, त्या खारेगाव येथील स्थानिक रहिवासी होत्या. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. खारेगाव येथील गजबजलेल्या परिसरातून जात […]

अधिक वाचा...

दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; त्यापैकी सहा मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती…

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या. त्यापैकी एका सहा मजली इमारतीमध्ये दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. अपघात झाला, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्येच होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती विद्यार्थी अडकले आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. सुरक्षेसाठी जवळच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!