
हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…
कोल्हापूर: एका भीषण अपघातामध्ये पत्नी आणि दोन मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर तेव्हापासून नैराश्यात गेलेल्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना शेवटचा हार अर्पण करून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराट विठ्ठललाल गौतम (वय 58) असे या वडिलांचे नाव आहे. विराट विठ्ठललाल गौतम पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरात पुईखडीजवळ 23 नोव्हेंबर 2023 रोजी खासगी बस उलटून झालेल्या अपघातात विराट गौतम यांच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला होता. ते या अपघातात बचावले होते. पण, पत्नी आणि दोन मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर ते नैराश्यात गेले होते. ते अपघात झालेल्या ठिकाणी बसून रडत होते. त्यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत हृदयद्रावक शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आज कोल्हापूरमध्ये देहत्याग केला आहे. कसं जगतोय माहीत नाही. जगामध्ये काही लोक अशी असतात ज्यांच्याशिवाय जगणं कठिण असतं. असं वाटतं की, ती लोक जगातून निघून गेल्यानंतर आम्ही कसे जगणार. माझं जग तेव्हाच संपलं होतं. गेल्या अडीच वर्षांपासून नीलू, रसिका आणि शर्विलशिवाय कसं जगलो हेच मला माहीत नाही. मी माझा देह आज त्यागत आहे. नीलू, रसिका आणि सर्विल शिवाय मी अडीच वर्ष कसा जगलो माहित नाही. माझे जग त्या क्षणी संपलं होतं.’

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, कोल्हापूर-राधानगरी रोडवरील पिरवाडी-पुईखडी घाटात काही वाहनधारकांना शुक्रवारी सकाळी घाटात त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. करवीर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे कोल्हापूर आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्याहून मुंबईला जाणारी एक खासगी बस या घाटात उलटली होती. या अपघातात विराट यांची पत्नी नीलू (43), मुलगी रिद्धिमा (17) आणि मुलगा सार्थक (13) यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी विराट हे जखमी अवस्थेत बचावले होते. कुटुंबाला गमावल्यानंतर विराट हे प्रचंड नैराश्यात होते. ते नियमितपणे या अपघातस्थळी येऊन आपल्या कुटुंबीयांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहत असायचे.
हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

