
बायको अन् तिचा प्रियकर खोलीत एकत्र आणि नवरा घराबाहेर….
रांची (झारखंड) : एका विवाहित महिला प्रियकरासोबतच खोलीत झोपली होती तर पती पतीचा घराबाहेर पलंग ठेवला होता. पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
घाटशिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात ही घटना घडली आहे. दोघांच्या मारहाणीत पती माणिक सेत गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्याधिकारी पार्वती मुर्मू यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी पती माणिकला उचलून उपविभागीय रुग्णालयात नेलं, तर पत्नी सुनीता आणि तिचा प्रियकर ऋषिकेश तंतुबाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माणिकने सांगितले की, ‘आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर कविराज ऋषिकेश वारंवार घरी येऊ लागला. दरम्यान, त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. मी एका टेलरच्या दुकानात काम करतो. याचा फायदा दोघांनी घेण्यास सुरुवात केली. दोघांचे प्रेमप्रकरण इतकं वाढले की ऋषिकेश माझ्याच घरी राहू लागला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितलं असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, माझी पत्नीही त्याला साथ देऊ लागली. मी आईसोबत घराबाहेर झोपायचो आणि ऋषिकेश माझ्या पत्नीसोबत खोलीत झोपायचा. दोघांना रंगेहात पकडलं असता ऋषिकेश आणि सुनिता यांनी मला बेदम मारहाण केली.’
दरम्यान, माणिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…
प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…
धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..
डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

