
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…
मुंबईः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी (ता. १५) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे आणि मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर बसने 3 खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले असून 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या नागरिकांना हेल्प फाउंडेशन या बचाव टीमकडून गॅस कटरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
View this post on Instagram
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरील टेम्पो आणि बस अपघातानंतर चारही लेन खुल्या करण्यात आल्या आहेत. अडकून पडलेली वाहने तीन लेनवरून सुरू करण्यात आली आहे. अपघातातील वाहने बाजूला करण्यात पोलिसांना उशिरा यश आले असून मुंबई पुणे महामार्गावर मिसिंगलिंक वर सलग 2 अपघात घडल्यामुळे मिसिंगलिंक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…
काळाचा घाला! पिंपरीतील मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू…
राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…

