समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं…

जालना : समृद्धी महामार्गावर एक भरधाव ट्रकने मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर महिला मजूर या मार्गाच्या बाजूला काम करत होत्या. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडले. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने येत होता. ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडून पुढे केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला मजूर महिलांच्या मृतदेह पडलेले होते. हे दृश्य पाहून उपस्थितीत हादरले. अपघातानंतर स्थानिकांनी देखील मदतकार्य सुरू केलं आहे. काही जखमी महिला मजुरांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर 3000 रुपयांचा Fastag चालणार का? घ्या जाणून…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!