नांदेड हादरले! टोळक्याकडून युवकाची तलवारीने सपासप वार करत हत्या…
नांदेड: एक टोळके पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि त्यांनी तिघांवर सपासप वार केले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात सोमवारी (ता. ६) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत सागर यादव हा फायनान्सच्या व्यवसायात होता. मोक्काचा आरोपी असलेल्या केशव पवार याने सागरकडे खंडणी मागितली होती. खंडणी देण्यावरून दोघांमध्ये फोनवरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपी केशवने सागर यादव याच्यावर वार केले आहेत.
केशव पवार आपल्या गँगमधील 20 ते 22 जणांसोबत रात्री सागर यादव याला शोधत सराफा बाजारात आला होते. पोत्यात आणलेल्या एक एक तलवारी आणि खंजर काढत केशव पवारच्या गँगने सागर यादव आणि त्याच्या भावासह अन्य एकावर हल्ला चढवला. तलवारीचे वार झेलत सागरचा भाऊ कसाबसा जीव वाचवून घटनास्थळावरुन पळाला. पण सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. 20 ते 22 जणांच्या टोळक्यांनी सागरवर तलवारीने अनेक वार करण्यात आले. अनेक गंभीर वार झाल्याने सागरचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान, आरोपी केशव पवार याच्यासह 20 ते 25 जणांविरोधात हत्या, खंडणी आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील 17 आरोपींना अटक करण्यात आली असून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
सरकारी महिला अधिकाऱ्याची भोसकून हत्या…
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…
वडिलांना मारल्याचा वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!