गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…

मुंबईः नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, या कार्यक्रमादरम्यान साप शिरल्याचे समजल्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, एका सर्पमित्राने तो साप पकडल्यामुळे गोंधळ शांत झाला.

एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण, या कार्यक्रमात सापाने प्रवेश केल्याचे समजल्यानंतर काही वेळ गोंधळ उडाला होता. शिवाय, या कार्यक्रमाला युवकांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय, धिंगाणा घालत असल्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला.

दरम्यान, ‘सबसे कातील गौतमी पाटील’ आपल्या हटके अदांमुळे अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असते. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटला की गोंधळ, राडा या गोष्टी नेहमीच्याच झाल्या आहेत. पण नवी मुंबईतील तिच्या नृत्याच्या कार्यक्रमात सापाने हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल…

गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…

… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!