मुंबईत पॉर्न फिल्मचे शूटिंग सुरु असताना पोलिसांनी टाकली धाड…

मुंबई: एका अॅडल्ट फिल्मचे शूटिंग करताना आणि त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करताना पोलिसांनी धाड टाकली आणि तीन अभिनेत्यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला (20 आणि 34 वर्षे) आणि एका युवकाचा (वय 27) समावेश आहे.

संबंधित अॅपवर या चित्रपटाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. हे यूके स्थित ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मसारखे आहे, जिथे मुले आणि मुली अश्लील चित्रपट तयार करतात. येथे वापरकर्ते मासिक आधारावर खाजगी सामग्रीसाठी पैसे देतात. अंधेरी पश्चिम येथील फोर बंगले येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान एका जागेवर छापा टाकला. छाप्यादरम्यान सापडलेल्या तिघांना नंतर अटक करण्यात आली हे फक्त अभिनेते असून पोलिस ॲपच्या मालक आणि ऑपरेटरच्या शोधात आहेत.

पोलिसांनी सांगितले की, एका आठवड्यापूर्वी त्यांना या अॅपवर अशा आक्षेपार्ह व्हिडीओचे शूटिंग आणि लाइव्ह स्ट्रिमिंगची माहिती एका स्थानिक गुप्तचराकडून मिळाली होती. तेव्हापासून पोलीस अंधेरीतील चार बंगल्यांवर छापा टाकण्याच्या तयारीत होते. रविवारी पोलीस अधिकाऱ्यांनी अंधरी पश्चिम येथे छापा टाकला आणि आरोपींना रंगेहाथ पकडले.

इंस्टाग्रामवर थेट संदेशाद्वारे या अॅपच्या वापरकर्त्यांना लाईव्ह स्ट्रीमिंगची माहिती देण्यात आली. याशिवाय ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसारख्या सेवाही महिलांनी दिल्या आहेत. यासाठी वापरकर्त्यांना नोंदणी शुल्कासह 7500 रुपये जमा करावे लागतील आणि प्रत्येक दृश्यासाठी त्यांना आगाऊ पैसे द्यावे लागतील अशी माहिती आहे. आता हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवरूनही काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम २९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!