
नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…
कोल्हापूर: व्हनगुत्तीमधील (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील नवविवाहीत दाम्पत्याने फसवणूक झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. राहुल राजाराम परीट (वय 23) व त्यांची पत्नी अनुष्का (वय 21) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
इस्पुर्लीत एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन व्यक्तींकडून त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने दोघांनी टोकाचा निर्णय घेतला. राहुलचा विवाह सात-आठ महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद इस्पूर्ली पोलिसांमध्ये झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपली फसवणूक झाल्याची चिठ्ठी कुटुंबीय व इतरांना पाठविली होती. राहुलने सोशल मीडिया स्टेटसवर वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठ कोणी नाही. ‘लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा. आय एम सो सॉरी’ असा मेसेज टाकून आई-वडिलांची माफी मागितली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राहुलने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांना व्हॉटस्ॲपवर मेसेज केला होता. राहुल परीट महावितरणमध्ये काम करत होता. त्याची नियुक्ती कागल तालुक्यातील एका गावात होती. त्याने तेथील 109 ग्राहकांची वीज बिल भरणा रक्कम सुमारे एक लाख 45 हजार 760 जमा केली होती. ही रक्कम भरण्यासाठी एका सहकाऱ्याकडे दिली होती. त्याने ती रक्कम न भरता वडिलांच्या उपचारासाठी वापरली. दरम्यान, त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने याबाबत कोणालाही माहिती देऊ नको, मी तुला पैसे परत करतो, असे सांगितले होते.’
‘सतत पैसे मागितल्यानंतर यातील फक्त तीस हजार रुपये इतकीच रक्कम परत केली होती. कागल तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीने कर्ज मिळवून देतो, म्हणून माझ्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम घेतली. यानंतर कर्ज प्रकरणाबाबत त्याच्याकडे सतत पाठपुरावा केला असता त्याने परत न करता फसवणूक केली. दिलेली रक्कम परत मागितली असता केवळ दोन टप्प्यात दहा हजार रुपये ऑनलाईन दिले. मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही. या दोन व्यक्तींच्या वागण्याला कंटाळून हा निर्णय घेतला आहे. वीज बिल रक्कम स्वतः भरण्याइतकी माझी परिस्थिती नाही. माझी पोलिसांना विनंती आहे की, या दोघांकडील माझी रक्कम आई-वडिलांना मिळवून द्यावी,’ असे सुसाईड नोट मध्ये लिहीले आहे.
हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…
हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…