
नाशिक! रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू अन् तिथेच आठवडापूर्वी…
नाशिक: नाशिकमधील एका आलिशान रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. युवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. ज्या रिसॉर्टवर ही घटना घडली, तिथेच आठवडाभर आधी एका अन्य वधू पित्याचा देखील मृत्यू झाला आहे.
दीपशीखा गिरीश गोडबोले (वय २९, रा. मुंबई) असे मृत पावलेल्या वधूचे नाव आहे. दीपशीखा यांचा विवाह नाशिकमधील गंगापूर जवळील एका रिसॉर्टमध्ये ठरला होता. यासाठी संपूर्ण गोडबोले कुटुंब आणि वऱ्हाडी नाशिकमध्ये दाखल झाले होते. शनिवारी रात्री संगीत सोहळा उत्साहात पार पडला, दीपशीखा यांच्या हातावर मेहंदीही सजली होती.
रिसॉर्टमधील खोली क्रमांक २०१ मध्ये सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नातेवाईकांसोबत असताना दीपशीखा अचानक चक्कर येऊन पडल्या. त्यांच्या आत्या डॉ. स्वाती बापट यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीगुरूजी रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपशीखा यांना लग्नाच्या मुहूर्तासाठी तयार होत असताना थोडे अस्वस्थ वाटत होते. आदल्या रात्रीचे जागरण, लग्नातील धावपळ आणि दगदग यामुळे हे होत असावे, असा समज करून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हीच अस्वस्थता त्यांच्या जीवावर बेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, ज्या रिसॉर्टमध्ये ही घटना घडली, त्याच ठिकाणी अवघ्या आठवडाभरापूर्वी एका वधूपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. आता त्याच ठिकाणी हळदीच्या दिवशी वधूचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…
नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…
कुख्यात गुंड भूषण लोंढे 34 फुटांवरून उडी मारूनही अडकला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…
नाशिक हादरलं! प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो नवविवाहितेला दाखवले अन्…
नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…

