पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या युवकाला ‘तू इथे का थांबलास?’ अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक रविवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा शेळके असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. कृष्णा इतर दोन मित्रांसह थांबला होता. यावेळी चार आरोपी आणि कृष्णासह त्याच्या मित्रांचा वाद झाला, यातूनच कृष्णाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही वेळ महामार्गाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानतंर तणाव निवळला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणे होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!