आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे.

राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून आला होता. यावेळी चिमुकला अथर्व हा आईच्या मांडीवर बसलेला होता. त्यावेळी मद्यपी बापाने त्याला आईकडून जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि अंगणात नेऊन जमिनीवर आपटले. यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आईने गंभीर जखमी झालेल्या अथर्व याला मद्यपी बापाच्या तावडीतून सोडवले आणि उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अथर्वची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, लाखांदूर पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे पसिरसात मद्यपी बापावर राग व्यक्त केला जात आहे.

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपींनी केले भयानक राक्षसी कृत्य…

बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…

हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!