बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…

कोलकाता : एका जोडप्याने रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी या जोडप्याला दोन वेळचे अन्न मिळत नव्हते आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतल्यानंतर शेजाऱ्याना संशय आला. शिवाय, त्यांच्याकडे बाळही दिसत नव्हते. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचे सांगितले. कारण, त्यांना रील बनविण्यासाठी महागडा मोबाईल घ्यायचा होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता. प्रियंका घोष नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगीही आहे आणि ती देखील अंमली पदार्थांचं सेवन करते. या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चिमुकल्याची गरिबीमुळे की अन्य काही कारणांमुळे विक्री केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी विचार केला जात आहे.

मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!