पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; मुलगा झाला पोरका…

कोल्हापूर: पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या पतीने गळफास जगाचा निरोप घेतला आहे. संदीप भगवान बेलवळे (वय 39, रा. बेलवळे खूर्द, सध्या रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.

आईच्या आकस्मिक मृत्यू आणि वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे. पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या संदीप यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या आई त्यांच्यासोबत कोल्हापूर शहरात राहत होत्या. त्या सातत्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण, तरीही त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

संदीप आणि त्यांची पत्नी अनुराधा यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. त्यांना एकुलता एक 14 वर्षांचा मुलगा आहे. एप्रिल 2023 मध्ये संदीप यांच्या पत्नी अनुराधा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर संदीप यांनी पत्नीच्या विरहाने नैराश्याने ग्रासले होते. पत्नीच्या विरहाने नैराश्यात गेलेल्या संदीप 25 जुलैपासून बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा गिरगाव हद्दीत (ता. करवीर) गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत मृतदेह आढळून आला.

दरम्यान, अवघ्या तीन महिन्यात कुटुंबाला दुसरा मानसिक धक्का बसला आहे. संदीप यांच्या पश्चात मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!