क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपींनी केले भयानक राक्षसी कृत्य…

लखनौ (उत्तर प्रदेश): दोन लहान मुलांवर चोरीच्या संशय घेऊन त्यांच्याबाबत राक्षसी कृत्य केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सिद्धार्थनगरच्या पथरा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात वर्षांची दोन मुलं गेली होती. मुलांना चोर असल्याच्या संशयातून भयानक शिक्षा देण्यात आली आहे. मुलांना आधी पेट्रोलचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांना मानवी मुत्र पेऊ घातलं. शिवाय, त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची घालण्यात आली. या सर्व घटनेचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

स्थानिकांनी सांगितले की, पोल्ट्री फार्ममधून दोन हजार रुपयांची चोरी झाली होती. या मुलांनीच चोरी केली असा संशय आरोपींना होता. आरोपींनी मुलांना आपल्या दुकानावर चहा पिण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने आपल्या काही साथिदारांच्या मदतीने या मुलांना ही भयानक शिक्षा दिली. आरोपींनी या प्रकरणाचा एक व्हिडीओ बनवला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पीडित मुलांच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलामान्वये संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मोहम्मद आकिब, अब्दुल स‌ऊद, रफीउल्लाह, शेरअली आणि दीपक या आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी सऊद आणि शप्पू हे फरार आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!