मच्छिमाराला रात्रीच्यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला अन्…

पनवेल : एक युवती मोबाईल जास्त वेळ वापरते म्हणून कुटुंबिय ओरडले होते. घर सोडून गेलेल्या युवतीने समुद्रात उडी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियंका तांडेल (वय 20, रा. कासारभाट, ता. पनवेल) असे मृत युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका जास्त वेळ मोबाईल वापरते म्हणून घरातील ओरडले होते. त्यामुळे ती 23 ऑगस्ट रोजी दुपारी रागाच्या भरात ती घरातून निघून गेली होती. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नसल्याने घरातल्यांनी पनवेल पोलिस स्टेशन गाठले आणि आपली मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली होती.

सात दिवसानंतर म्हणजेच बुधवारी (ता. ३०) पहाटे 3 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पत्रात सापडला. रात्रीच्या वेळी मच्छिमारी करताना एका मच्छिमाराला मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने त्यांनी जवळच्या पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलिस ठाण्यात फोन करून सदर प्रकरणाची माहिती दिली होती.

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित गोळे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत, बोटीच्या साहाय्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मात्र, केवळ मोबाईल जास्त वेळ वापरल्याने ओरड दिल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!