हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

यवतमाळ: आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. संबंधित दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

रेश्मा नितीन मुडे (वय 28) असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन मुडे (वय 6) आणि सार्थक नितीन मुडे (वय 3) असे या चिमुकल्यांचे नाव आहे. सोमवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास रेश्मा मुडे यांनी आपल्या दोन्ही चिमुकल्यांना विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. काही वेळानंतर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली. कुटुंबियांनी तिघांनाही तातडीने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रेशमाने एवढे मोठे पाऊल का उचलले आणि आत्महत्या का केली? याबाबतचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान महागाव पोलीस ठाण्यात आई रेश्मा नितीन मुडे आणि सार्थक मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. श्रावणीचा मृत्यू पुसद येथील दवाखान्यात झाला त्यामुळे तिचा मृत्यूची नोंद पुसद पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, उमरखेड महागाव आणि पुसद येथील पोलीस विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! फलटणमधील पिता-पुत्र जेवण करून झोपले अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!