पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड भागात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवड येथे स्पा चे नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा चे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात, अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी यांना प्राप्त झाली होती. सांगवी पोलिस स्टेशन हद्दीत JP FAMILY स्पा, फ्लॅट नंबर 201 दुसरा मजला ब्रह्मावृंद कॉलनी इंगवले नगर पिंपळे निलख पुणे येथे अचानक छापा टाकला असता,
1) जया अशोक जाधव वय 33 वर्ष रा. घर नंबर 150 प्रभूदयाल परदेशी खाटीक चाळ बोपोडी पुणे स्पा चालक-मालक
2) निखिल मोहन नवघन वय 31 वर्ष रा. सर्वे नंबर 16 ऑब्लिक सात महादेव कॉलनी लक्ष्मी नगर थेरगाव पुणे यांच्या ताब्यातून तीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.

आरोपी यांना ताब्यात घेऊन सांगवी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 575/2023 भादवि कलम 370 (3), 34 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास सांगवी पोलिस स्टेशन पोलिस अधिकारी करत आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउनि धैर्यशील सोळंके, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा…

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पिंपरीमध्ये दोघांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने चिरडले अन्…

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!