हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय 3) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे बल्लारपूर येथून आपल्या घरी परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. पण, राजुरा पोलीस अपघातस्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केले. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय, कोळसा वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. मात्र, प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, अपघातात मृ्त्यु पडलेल्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…

सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; मुलगा झाला पोरका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!