अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…
अहमदनगर: पती-पत्नीच्या भांडणात बापाने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (ता. 6) घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38, रा. आळसुंदे, कर्जत) असे बापाचे नाव आहे. तर ऋतुजा (वय 8) आणि वेदांत (वय 4) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
गोकुळ क्षीरसागर याचे पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरसागरने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत आपल्या दोन्ही मुलांना फेकले. काही वेळातच दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकरी घटनास्थळी धावत गेले. दोन्ही मुलांना विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ शिरसागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गोकुळ शिरसागर याच्या दारुचे व्यसन आणि घरगुती भांडणातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…
हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
तेजस्विनी तुळशीला दिवा लावून घरात गेली अन्…
बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…