पुणे शहर परिसरात वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग कोणते…

पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!

विमानतळ परिसर
विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. न्यू एअरपोर्ट रस्त्यावर पुणे विमानतळाकडून रामवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना सिम्बायोसिस विधी महाविद्यालय चौकामध्ये उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग
वाहन चालकांनी दोराबजी मॉल चौकातून यू टर्न घेऊन किंवा एअरपोर्ट चौकातून पेट्रोल साठा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे.

बाणेर परिसरात वाहतुकीत बदल
बाणेर परिसरातील महाबळेश्वर हॉटेल चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पाषाण रस्ता येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.

पर्यायी मार्ग
बाणेर पाषाण लिंक रस्त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी डावीकडे वळून 45 आयकॉन आयटी कंपनीसमोरून यू टर्न घेऊन हॉटेल महाबळेश्वर चौकातून विद्यापीठमार्गे इच्छित स्थळी जावे. बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्ता येथे जाण्यासाठीमाऊली पेट्रोल पंपाकडून यू टर्न घेऊन पुन्हा महाबळेश्वर हॉटेल चौकात यावे. तेथून डावीकडे वळून बाणेर पाषाण लिंकमार्गे इच्छित स्थळी जावे.

खराडी भागात वाहतुकीत बदल
खराडी बायपासमार्गे खराडी दर्गा चौकातून उजवीकडे वळून खराडी गाव किंवा युआन आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण घेण्यास मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
वाहनचालकांनी खराडी बायपास चौकातून सरळ पुढे अडीचशे मीटर अंतरावर जाऊन आपले घर बसस्थानकाच्या पुढील बाजूस यू टर्न घ्यावा. तेथून खराडी दर्गा चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.

निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!