पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…
पुणे (महेश बुलाख): पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी ६० ते ७० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून लुटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
२३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०७:४५ वाजण्याचे सुमारास एक मजुर हा डांगे चौकातून पायी घरी जात असताना ताथवडे रोड, डांगे चौका जवळ ०२ बाईक वरून आलेल्या धमकावून व मारहाण करुन तसेच चाकुने गंभीर दुखापत करुन त्याचे जवळील दहा हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी करुन तेथुन पळून गेले होते. याबाबत वाकड पोलिस स्टेशन गु.र. नंबर ७१२/२०२३ भा.द.वि. कलम-३९४,३२३,५०४,३४ आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदरचे प्रकार गंभीर स्वरुपाचे असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सदर बाबत गुन्हे शाखेने लक्ष घालून आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
गुन्हे शाखा युनिट ४ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे व दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांना सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर घडलेल्या गुन्ह्या बाबत सयुक्तरित्या तपास करुन आरोपी निष्पन्न करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तेव्हा दाखल गुन्हयातील आरोपींताचा शोध घेणे कामी गुन्हे शाखा युनिट-४ चे सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर यांचे एक पथक व दरोडा विरोधी पथकाचे सपोनि अंबरिष देशमुख यांचे दुसरे पथक अशी दोन पथके तयार केले. त्यानंतर सदर पथकांनी मिळुन सदरचे आरोपी हे कोणत्या मार्गाने गुन्हा करण्यासाठी आले तो मार्ग व गुन्हा केल्या नंतर ते डांगे चौकातून रावेतच्या दिशेने गेले त्या परिसरातील ६० ते ७० ठिकाणेचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा प्राप्त सी.सी.टी.व्ही मधून सदरचा गुन्हा हा दोन मोटारसायकलवर आलेल्या एकूण ०६ आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही पथकांनी सी. सी. टी. व्ही फुटेज व्दारा व बातमीदारां मार्फत सहा आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर २६/०७/२०२३ रोजी त्यातील पथकांनी आरोपी अजय शंकर शर्मा (वय १९ वर्षे, रा-बिजली नगर, चिंचवड) व ०३ वि. स. बालक यांना बिजली नगर चिंचवड, भोंढवे वस्ती रावेत, भिमा कॉलनी रावेत अशा वेगवेगळ्या ठिकाणा वरुन शिताफीने ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकिस आणला आहे. तसेच सदर आरोपी व वि.स. बालकांकडे दाखल गुन्हयांचे अनुषंगाने तपास केला असता सदर आरोपींनी त्यांचे पाहिजे साथिदार सौरभ संतोष आरगळे, रा-रुपीनगर, निगडी व मुकेश गुप्ता, रा-बिजली नगर, चिंचवड यांचेसह सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी व वि.सं. बालक यांना ताब्यात घेते वेळी त्यांचे कडे अशा प्रकारे चोरी केलेले परंतु गुन्हे दाखल नसलेले ०३ मोबाईल फोन मिळून आले असून एकास धमकावून व मारहाण करुन लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले असून अधिक तपास सुरु आहे. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मॅट्रीक सेक्युरिटी अॅन्ड सव्हेलन्स प्रा.लि कंपनीचे सी. सी. टीव्ही फुटेजचा महत्वाचा उपयोग झाला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप-आयुक्त, मुख्यालय/गुन्हे स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे सतिष माने, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सपोनि अंबरिष देशमुख, तसेच गुन्हे शाखा युनिट-४ चे सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, आबासाहेब किरनाळे, पोहवा / प्रविण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच दरोडा विरोधी पथकाचे सपोउपनि महेश खांडे, पोहवा / नितीन लोखंडे, पोना / गणेश हिंगे, आशिष बनकर, पोशि/ समिर रासकर, आबा कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, कांबळे, पोशि / तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय तुंगार, स.पो. नि. सागर पानमंद, पोहवा / नागेश माळी, पोशि/पोपट हुलगे यांनी केली आहे.